Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुत्रा चावल्यास राज्य सरकारने पीडित व्यक्तीला 20 हजार रुपये भरपाई द्यावी - उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्रा चावल्यास राज्य सरकारने पीडित व्यक्तीला 20 हजार रुपये भरपाई द्यावी - उच्च न्यायालयाचा निर्णय


चंदीगड:  कुत्रा चावण्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी कोणत्या व्यक्तीला चावा घेतल्यास तर त्याची नुकसान भरपाई दोन्ही राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे.

पीडित व्यक्तीला 10,000 रुपये प्रति दात अशी भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही दिले. रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने 193 याचिकेवर तोडगा काढताना हा निर्णय दिला आहे. कुत्रा चावल्यामुळे दातांच्या खुणा दिसल्यास पीडित व्यक्तीला प्रति दाताच्या खूणाप्रमाणे 10000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे खंडपीठाने म्हटले. याशिवाय कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाल्यास किंवा कुत्र्याने मांस काढले असेल तर प्रत्येकी 0.2 सेमी जखमेसाठी किमान 20 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, कसे कोर्टाने आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर खंडपीठाने सांगितले की, कुत्र्याशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीकडून राज्य सरकार नुकसानभरपाईची रक्कम वसूल करू शकते. कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण न आल्यास प्रकरणे आणखी वाढतील. त्यामुळे आता राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.