Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अकोल्यात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

अकोल्यात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना अकोल्यात घडली. गणेश चंद्रशेखर कुंभरे (29) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलीचे मुंडणही केले. हा प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीला समजताच त्यांनी खदान पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

गुंड प्रवृत्तीचा आरोपी मुलीची रोज छेड काढायचा. पीडितेच्या वडिलांनाही तो ठार मारण्याची धमकी देत होता. 15 नोव्हेंबरला पीडितेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला सिंधी कॅम्प येथील स्मशानभूमीत नेले व सिगारेटचे चटके दिले. परिसरातील काही मुले मदतीसाठी आल्याने आरोपी पळाला. त्यानंतर आरोपी दारू पिऊन पीडितेच्या घरी गेला व तिच्यावर बलात्कार केला. मुलीला विद्रूप करण्यासाठी तिला एका सलूनमध्ये नेले व तिचे मुंडण केले. हा सर्व प्रकार पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी गणेश कुंभरेविरुद्ध पोक्सो कायदा कलम 4 व 8 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.