Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिंदच्या सरकारी शाळेतील 142 अल्पवयीन मुलींचा मुख्याध्यापकावर सहा वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आरोपीला अटक

जिंदच्या सरकारी शाळेतील 142 अल्पवयीन मुलींचा मुख्याध्यापकावर सहा वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आरोपीला अटक


हरियाणातून मुलींवरील लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या जिंदमधील एका सरकारी शाळेत शिकणाऱ्या तब्बल 142 अल्पवयीन मुलींनी मुख्याध्यापकावर सहा वर्षांच्या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. बुधवारी एएनआयशी बोलताना, जिंद जिल्ह्याचे उपायुक्त मोहम्मद इम्रान रझा म्हणाले, ‘उपविभागीय दंडाधिकारी  यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने एकूण 390 मुलींचे जबाब नोंदवले आहेत. मुलींवरील लैंगिक अत्याचाराबाबत पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे 142 घटनांच्या तक्रारी पाठवल्या आहेत. या 142 मुलींपैकी बहुतांश मुलींनी मुख्याध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला तर बाकीच्यांनी या भीषण कृत्याचे साक्षीदार असल्याचे सांगितले. आरोपी मुख्याध्यापक सध्या तुरुंगात आहे.’

उल्लेखनीय आहे की, सुमारे 15 मुलींनी यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे सरन्यायाधीश डीवाय चद्रचूड, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग आणि इतरांना या कथित भयंकर कृत्यांबाबत  पत्रे लिहिली होती. 13 सप्टेंबर रोजी हरियाणा महिला आयोगाने या पत्राची दखल घेतली आणि दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी ते जिंद पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणात 30 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल केला. आरोपीला 4 नोव्हेंबर रोजी अटक करून 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, आरोपी मुख्याध्यापकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.