Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फटाके फोडताना काच पोटात घुसल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

फटाके फोडताना काच पोटात घुसल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू


फटाके फोडताना झालेल्या स्फोटात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली. हा मुलगा एका काचेच्या ग्लासमध्ये फटाके फोडत होता. या वेळी झालेल्या स्फोटामध्ये ग्लासची काच पोटात घुसली तसेच त्याच्या शरीराला इतर ठिकाणीही गंभीर जखमा झाल्या.

यामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. शौर्य सिंह असे या मुलाचे नाव आहे. शौर्य याने आपल्यासोबत घडलेला प्रकार प्रथम लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेथे त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा इयत्ता सातवीतील विद्यार्थी होता. त्याला मुरादाबादमधील उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवले जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.


दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल माहिती देताना नूरपूरचे एसएचओ संजय कुमार म्हणाले, "ही घटना बिजनौरमधील मोराना गावात घडली. आम्ही गावात चौकशीसाठी गेलो होतो, परंतु मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस तक्रार दाखल केली नाही."


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.