Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" मराठा समाजाला आरक्षण दिले तर फडणवीसांना 10 किलो सोन्याचा हार घालणार..."

" मराठा समाजाला आरक्षण दिले तर फडणवीसांना 10 किलो सोन्याचा हार घालणार..."


मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्राचं राजकारण पेटलं आहे.याच आंदोलनाचे सावट पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेवर देखील होतं.तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणाऱ्या या पूजेला देखील विरोध दर्शविला होता. पण मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या मान्य केल्याने फडणवीसांच्या पूजेचा मार्ग मोकळा झाला. फडणवीस हे महापूजेसाठी बुधवारी पंढरपुरात दाखल झाले आहे. याचवेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पंढरपूर येथे पार पडली. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी फडणवीसांना शब्द दिला. ते म्हणाले, जर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर फडणवीसांना 10 किलो सोन्याचा हार घालणार आहे.उपमुख्यमंत्री यांच्या पंढरपूर दौर्याला आणि शासकीय महापूजेला गायकवाड यांनी विरोध विरोध केला होता.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठोबाची पंढरी कार्तिकी सोहळ्यासाठी  सज्ज झाली आहे.या सोहळ्यासाठी राज्यभरातील सात लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.दरम्यान,बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल झाले आहे. तसेच,उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या 2700 कोटीच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत.तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी बुधवारी दुपारी चर्चा केली आहे. यासोबतच,धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची देखील भेट होण्याची शक्यता आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने 8 सप्टेंबरपासून पंढरपुरातील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत होते. आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध दर्शवला होता. आपल्या निर्णयावर आंदोलक 18 नोव्हेंबरपर्यंत ठाम होते.

दरम्यान, या आंदोलकांमध्ये दोन गट पडले होते. एका गटाने शासकीय महापूजेला विरोध नाही, तर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध कायम असल्याचे सांगितले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलनकर्ते गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळही मराठा शिष्टमंडळाने वेळ मागितला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.