Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाळेतील भांडणातून वर्गमित्रावर हल्ला; इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलास कंपासने 108 वेळा भोसकले

शाळेतील भांडणातून वर्गमित्रावर हल्ला; इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलास कंपासने 108 वेळा भोसकले


शाळेतील किरकोळ भांडणावरुन इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन मुलांनी आपल्याच वर्गमित्रावर भूमिती कंपासने  हल्ला केला आहे. धक्कादायक असे की, या मुलांनी पीडित विद्यार्थ्याला तब्बल 108 वेळा कंपासने भोसकले.

मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. घडल्या प्रकाराची शालेय प्रशासन, पोलीस आणि. बाल कल्याण समितीने (CWC) त्वरीत दखल घेत कारवाई केली आहे. या गंभीर प्रकाराचा तपशील जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास करणार असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कथीत रुपात किरकोळ कारणावरुन मारामारी झाली होती. त्यातून मुलांनी ग्रूप करुन हा धक्कादायक प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी पोरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी एअरोड्रोम पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका खाजगी शाळेत ही घटना उघडकीस आली. हे प्रकरण धक्कादायक आहे. आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. एवढ्या लहान वयातील मुलांच्या हिंसक वर्तनाचे कारण शोधण्यासाठी पोलिसांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्याबाबतचा अहवालही आम्ही मागवल्याचे त्या म्हटले. 

बाल कल्याण समितीने (CWC) घडल्या प्रकाराची गंभीरपणे नोंद घेतली आहे. या हिंसग प्रकरणात गुंतलेल्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे सीडब्ल्युसीचे मत आहे. याशिवाय अशा हिंसक कारवाईमागे नेमके काय कारण असावे याचाही शोध घेतला जाणार आहे. ही मुले इतक्या टोकाची हिंसा कोठून शिकली तसेच अशा प्रकारचे काही व्हिडिओ गेम खेळण्या ही मुले गुंतली होती का? याचाही शोध सीडब्ल्युसीद्वारे घेतला जाणार आहे.

पीडित मुलाच्या वडिलांनी दावा केला की, ही घटना 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मुलाला गंभीर जखमा झाल्या असून तो गंभीररित्या जखमी झाला आहे. इतकी भयंकर घटना घडूनही शाळेने कोणत्याही प्रकारची तत्परता दाखवली नाही, याबद्दल त्यांनी प्रचंड निराशा व्यक्त केली. हा प्रकार शाळेतून घरी आल्यानंतर मुलाने आपल्याला कथन केला. त्यानंरच याबातब आपल्याला माहिती मिळाली. एकाच वर्गात शिकत असताना वर्गमित्रांनी माझ्या मुलाला इतक्या हिंसकपणे का वागणूक दिली हे मला अद्यापही समजू शकले नाही. शालेय प्रशासनाकडे अनेकदा मागणी करुनही मला सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही, असा आरोपही पीडित मुलाच्या विद्यार्थ्याने केला.

दरम्यान, सदर घटनेबाबत एअरोड्रोम पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सिंह चौहान यांनी तक्रारीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची पुष्टी केली. विशेष म्हणजे, या घटनेत सामील असलेली सर्व मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. त्यामुळे चौकटीत राहुनच परिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासाठी कायदेशीर उपाययोजना केल्या जात आहेत, असे एसीपी चौहान म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.