Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासह विविध पुरस्कारासाठी 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत

मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासह विविध पुरस्कारासाठी 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत


सांगली, दि. 6 : मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता), द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड 2023 करिता पुरस्कारासाठीचे प्रस्ताव दि. 10 नोव्हेंबर, 2023 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

विहीत कालावधीनंतर प्राप्त होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही. या वर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदारानी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलव्दारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/ अथवा व्यक्तींची शिफारस न घेता थेट केंद्र शासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर/ वेबसाईटवर सादर करावी. ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण आल्यास Department of Sports At section.sp4-moyas@gov.in, किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत संपर्क करता येईल. तसेच केंद्र शासनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली व विहीत नमुना अर्ज https://yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे श्री. बोरवडेकर यांनी  प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.