Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' या ' बँकेवर RBI ची मोठी कारवाई; लाखो ग्राहकांना बसणार झटका, तुमच खातं तर नाही ना?

' या ' बँकेवर RBI ची मोठी कारवाई; लाखो ग्राहकांना बसणार झटका, तुमच खातं तर नाही ना?


नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँक  ने आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली आहे. RBI ने केलेल्या या कारवाईमुळे ग्राहकांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या मोबाईल ऍप्लिकेशन 'BoB वर्ल्ड' वर नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली आहे. मटेरियल पर्यवेक्षकीय चिंतेचा हवाला देऊन तत्काळ प्रभावाने हे थांबवले आहे. याचाच अर्थ असा की, आता नवीन ग्राहक BoB वर्ल्ड चा वापर करू शकणार नाही. तसंच, बँक ऑफ बडोदाच्या जुन्या ग्राहकांना मात्र याचा कोणताही फटका बसणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, बँक ऑफ बडोदाला 'बॉब वर्ल्ड' मोबाइल ऍप्लिकेशनवर आपल्या ग्राहकांच्या पुढील प्रवेशास तत्काळ प्रभावाने स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

RBI ने का बंदी घातली?

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, अॅपवर ग्राहक जोडले जाताना काही त्रुटी आढळल्या. ही चिंतेची बाब होती. आरबीआयने म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, ब‌ँक ऑफ बडोदाला बॉब वर्ल्ड वर अधिक ग्राहक जोडण्याची प्रक्रिया निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मोबाइल अॅपची सेवा तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहे. नवीन ग्राहक अ‌ॅपशी जोडताना या त्रुटींवर मात करणे आवश्यक आहे. आरबीआयचे समाधान झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरबीआयने म्हटलं विद्यमान ग्राहकांना कोणतीही समस्या येऊ नये सध्याच्या 'बॉब वर्ल्ड' ग्राहकांना या निलंबनामुळे कोणत्याही व्यत्ययाला सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी आरबीआयने बँक ऑफ बडोदाला निर्देश दिले.



बँक ऑफ बडोदाने व्याजदरात केली वाढ

बँक ऑफ बडोदाने तीन वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीसाठी FD व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की बँकेचे हे नवीन दर 9 ऑक्टोबर 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी लागू आहेत.

नवीन व्याजदर लागू केल्यानंतर, बँक आता आपल्या ग्राहकांना 2-3 वर्षांसाठी 7.25 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.75 टक्के व्याज मिळत आहे. सध्याच्या ग्राहकांनाही व्याजदर वाढीचा फायदा होणार आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.