Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल

QR Code स्कॅन करण्याच्या नादात होईल लाखोंचं नुकसान; फसवणुकीची पद्धत पाहून डोकं भणभणेल


ऑनलाईन शॉपिंग असो, महागातली खरेदी असो किंवा मग अगदी वाणसामान आणण्यासाठी किराणामालाच्या दुकानात जाणं असो, तुमच्यापैकी अनेकजण दुकानात गेल्यानंतर तिथं ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करता. एका मिनिटापेक्षा कमी वेळात या चौकड्यांच्या कोडच्या माध्यमातून तुमच्या खात्यातले पैसे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. पण, सतत डिजीटल पेमेंट आणि त्यातही क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे देण्याच्या नादात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

सध्या घोटाळेबाजांची नजर या क्यूआर कोडवर असून, तुमची एक चुकही मोठं नुकसान करणारी ठरू शकते हेच इथं लक्षात येत आहे. सध्या इतरांची फसवणूक करण्यासाठी घोटाळेबाजांकडून फिशिंग लिंकची मदत घेतली जात आहे. जिथं QR कोड ईमेलच्या माध्यमातून पाठवत अनेकांचीच फसवणूक करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. फक्त ईमेलच नव्हे, तर इतरही अनेक पद्धतींनी नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. 

कशी केली जातेय फसवणूक? 

सध्या अनेकांना पाठवण्यात येणारे क्यूआर कोड फिशिंग लिंक आणि स्कॅम पेजशी एनकोडेड असतात. कोणत्याही युजरनं या कोडला स्कॅन केल्यास ते जाळ्यात अडकतात आणि घोटाळेबाजांचा पुढचा डाव सुरु होतो. एखादं गिफ्ट किंवा रिटर्न्ससाठी जेव्हा युजर्स कोड स्कॅन करतात तेव्हा त्यांनी पासवर्ड देणं बंधनकारक असतं. हा पासवर्ड दिल्यास तुम्हीही या घोटाळ्याचे शिकार होता. कारण, इथं तुमची फसवणूक होत असून, खात्यातून पैसे कापले जातात. सध्या या घोटाळेबाजांकडून गिफ्ट, रिटर्न्सच्या बाबतीत युजर्सना फसवत त्यांच्या खात्यातील पैशांवर डल्ला मारला जात आहे. 

FBI नं केलं सतर्क 

एखाद्या दुकानात गेलं असता तिथं अनेक क्यूआर कोड लावलेले दिसतात. यामध्येच अनेक फसवे कोडही लावण्यात येतात. यासंदर्भात अमेरिकन संस्था FBI नं युजर्सना सतर्क केलं आहे. ज्याप्रमाणं एखाद्या माशाला पकडण्यासाठी जाळं पसरवलं, चारा दिला जाततो त्याप्रमाणं इथंही युजर्ना फसवण्यासाठी हे जाळं तयार केलं जात आहे. SMS च्या माध्यमातून ही फसवणूक होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं तुम्हीही इथून पुढं एखाद्या दुकानात गेलं असता तिथं क्यूआर कोड स्कॅन करताना सावध राहा!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.