Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Israil ! या युद्धाचा चिमुकल्यांचा काय दोष? हमासच्या हल्ल्यात 40 नवजात बालकांचा मृत्यू

Israil ! या युद्धाचा चिमुकल्यांचा काय दोष? हमासच्या हल्ल्यात 40 नवजात बालकांचा मृत्यू 


रशिया-युक्रेन युद्धाची आग शांत झालीच होती, तितक्यात पुन्हा जगात आणखी एक युद्ध सुरु झालं. हमासने इस्राइलवर रॉकेट हल्ला करत पुन्हा इस्राइलला चिथावणी दिली. मात्र, एक हल्ला करुन हमास थांबला नाही, तर हल्ला आणखी तीव्र करण्यात आला आणि इस्राइलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली. मात्र, या युद्धांनी आपला राक्षसी चेहरा पुन्हा जगासमोर आणला आहे. हमासच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ४० बालकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आय२४ न्यूजने माहिती दिली.

काही सैनिकांचं म्हणणं आहे की त्यांना काही बालकाचं मृतदेह आढळले, ज्यांची हत्या क्रुरपणे करण्यात आली होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून ठार करुन, त्यांचे मृतदेह पलंगावर रचण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे 40 बाळांना आणि लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, असे i24 न्यूजने वृत्त दिले आहे

7 ऑक्टोबरला इस्रायलवर हमासने क्रूर 'आश्चर्यचकित हल्ला' केल्यानंतर या हल्ल्यात किमान 900 इस्रायली ठार झाले आणि 2,616 हून अधिक लोक जखमी झाले.त्याच्या आदल्या दिवशी, इस्राइलच्या संरक्षण दलांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारांना कफार अझ्झा या ठिकाणी नेलं, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या विनाशकारी हल्ल्यात ७० रहिवाश्यांना आपला जीव गमवावा लागला होता. याबाबत टाईम्स ऑफ इस्राइलने वृत्त प्रकाशित केलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्राइलने देखील हमासच्या ठिकाणांवर हल्ला चढवला. गाझापट्टीवर मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव केला आणि हमासचे ठिकाणं उध्वस्त केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.