Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Google ची भन्नाट सुविधा! 15,000 च्या लोनवर द्या फक्त 111 रुपये महिन्याचा हप्ता

Google ची भन्नाट सुविधा! 15,000 च्या लोनवर द्या फक्त 111 रुपये महिन्याचा हप्ता


नवी दिल्ली : जगातील दिग्गज टेक कंपनी Google नेहमी आपल्या यूझर्सला यूनिक सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करते. याच कडीमध्ये पेमेंट अ‍ॅप 'गूगल पे'ने सामान्य व्यक्तीच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी सॅशे लोनची सुरुवात केली आहे.

गुगलच्या या नवीन ऑफरमुळे छोट्या व्यावसायिकांना 15,000 रुपयांचे कर्ज सहज मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. गुगलने 15,000 रुपयांच्या या छोट्या कर्जाला सॅशे लोन असे नाव दिले आहे.

सॅशे लोन काय आहे?

सॅशे लोन एक प्रकारच्या छोट्या आणि प्री-अप्रूव्ड लोन असतात. याचा अवधी 7 दिवस ते 12 महिन्यांपर्यंतचा असतो. गूगलने ट्विट करत याची माहिती दिली. गूगलने म्हटलं की, 'आम्ही नेहमीच पाहिलंय की, छोटे व्यापारी नेहमीच छोटे लोन आणि सुलभ परतफेड पर्यायांसह कर्ज मिळवू इच्छितात. ही गरज पूर्ण करण्यासाठी Google Pay, @DMIFinance सह सॅशे लोन सुरु करत आहे. यामध्ये 15,000 रुपयांचं लोन मिळेल आणिते 111 रुपयांच्या सोप्या हप्त्यांमध्ये फेडता येईल.'

ज्या यूझर्सला रोजचा व्यवसाय करायचा आहे आणि दररोज कर्ज भरायचे आहे त्यांच्यासाठी गुगलची ही सुविधा खूप फायदेशीर ठरेल. गुगलने कर्ज देण्यासाठी आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, फेडरल आणि एचडीएफसी बँक या चार बँकांशी करार केला आहे.

कसं मिळेल लोन?

- गूगलने ही लोन सर्व्हिस सध्या टिअर 2 शहरांमध्ये सुरु केली आहे. चला जाणून घेऊया या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा.
- सर्वात आधी Google Pay for Business अॅप ओपन करा किंवा डाउनलोड करा.
- यानंतर लोन सेक्शनमध्ये जाऊन ऑफर्स टॅबवर क्लिक करा.
- कर्जाची रक्कम टाकून करून पुढे जा. यानंतर तुम्हाला लँडिंग पार्टनरच्या साइटवर रीडायरेक्ट केले जाईल.
-येथे KYC सह काही सोप्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लोन मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.