Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! जेवणानंतर फिरायला गेलेल्या महिलेचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या मुलालाही मारहाण

Breaking News  ! जेवणानंतर फिरायला गेलेल्या महिलेचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या मुलालाही मारहाण 


पुणे : मुलासोबत फिरण्यासाठी जात असताना २४ वर्षीय तरुणाने महिलेचा हात धरत तिचा विनयभंग  केला. याबाबत मुलाने जाब विचारला असता त्याला बेदम मारहाण केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. रात्री अकराच्या सुमारास अंबिका नगर येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत बिबवेवाडी येथील ५० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कुणाल झोंबाडे (वय २४) याच्यासह इतर ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचा मुलगा जेवणानंतर फिरण्यासाठी चालत जात होते. त्यावेळी मुलाच्या ओळखीचा असलेल्या कुणाल झोंबाडे याने तक्रारदारांचा हात पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

दरम्यान, याप्रकारानंतर त्यांच्या मुलाने याचा जाब विचारला असता आरोपी व त्याच्या इतर तीन साथीदारांनी तक्रारदार यांच्या मुलाला बेदम मारहाण केली. याप्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.