Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जीवघेण्या व्हायरसनं वेधलं जगाचं लक्ष, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

जीवघेण्या व्हायरसनं वेधलं जगाचं लक्ष, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ


मुंबई : तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला. लाखो लोकांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले. भारतातही अनेकांचा मृत्यू झाला, तर काही बचावले. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारातून जग सावरलं असताना आता फ्रान्समधल्या एका आजाराने खळबळ माजवली आहे.

हा किड्यांच्या माध्यमातून पसरणारा आजार आहे आणि या आजाराची लागण झाल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. जगातल्या सर्वांत घातक आजारांपैकी एक फ्रान्समध्ये सापडला आहे. या आजारामुळे सध्या खळबळ उडाली आहे. हा आजार ज्यांना होतो, त्या पीडितांच्या डोळ्यांतून रक्त वाहू शकतं. या आजाराचे नाव क्रिमियम कांगो रक्तस्रावी ताप असं आहे. शास्त्रज्ञांना भीती आहे, की क्रिमियन-कांगो रक्तस्रावी ताप (CCHF) लवकरच ब्रिटनच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो. फ्रेंच आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं, की 'हा विषाणू ईशान्य स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पायरेनीस ओरिएंटेलमध्ये टिक्समध्ये म्हणजेच एक प्रकारच्या कीटकांमध्ये आढळून आला आहे. सध्या तरी फ्रान्समध्ये आतापर्यंत या आजाराच्या संसर्गाचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही; पण तो सीमेवर कीटकात आढळला ही बाबही चिंताजनक आहे.'

शास्त्रज्ञांनी सांगितलं, की क्रिमियन-कांगो रक्तस्रावी ताप कीटकांच्या माध्यमातून पसरतो. तो आफ्रिका, बाल्कन, मध्य पूर्व आशिया आणि आशिया यांसारख्या उष्ण हवामानाच्या ठिकाणी आढळतो. डब्ल्यूएचओने सांगितलं, की हा आजार खूप दुर्मीळ असून, तो 40% नागरिकांचा जीव घेऊ शकतो.

जुलैमध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता, की हवामानबदलामुळे हा रोग त्याच्या सामान्य क्षेत्राबाहेर आणि युनायटेड किंग्डम (यूके) आणि फ्रान्सच्या दिशेने जाऊ शकतो. 2016 ते 2022 दरम्यान स्पेनमध्ये या आजाराची 7 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे.

केंब्रिज विद्यापीठातील पशुवैद्यकीय विभागाचे प्रमुख प्रोफेसर जेम्स वुड यांनी सायन्स समिटमध्ये सांगितलं, की सीसीएचएफ (CCHF) केव्हाही टिक्स म्हणजेच कीटकाच्या माध्यमातून यूकेमध्ये पोहोचू शकतो. दुसरीकडे 'द सन' वृत्तपत्राशी बोलताना लिव्हरपूल विद्यापीठात एव्हियन संसर्ग व प्रतिकारशक्ती विषयाचे प्रोफेसर पॉल विग्ले यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांच्या मते प्रोफेसर जेम्स वुड यांची भविष्यवाणी बरोबर आहे आणि तो आजार कीटकांद्वारे लवकरच यूकेमध्ये पोहोचू शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.