Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या दोघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली एलसीबीची कारवाई

ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या दोघांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली एलसीबीची कारवाई

सांगली :  जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक गुन्हा उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

ज्ञानेश्वर विठ्ठल कोरे (वय २६, रा. कागनरी तांडा, जत), राजू सोमराव राठोड (वय २६, रा. कागनरी तांडा, जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकाला चोरट्यांना अटक करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

पथक जत तालुक्यात गस्त घालत असताना दोन्ही संशयितांनी हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथून एक ट्रॅक्टर चोरला असून तो त्यांच्या घरामागे लपवल्याची माहिती खबऱ्याद्वारे पथकाला मिळाली. पथकाने कागनरी तांडा येथे छापा टाकल्यानंतर चोरीचा ट्रॅक्टर आढळला. त्याबाबत दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अरविंद मल्लू चव्हाण याच्या मदतीने हरोली येथून ट्रॅक्टर चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला.  एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, दीपक गायकवाड, अनिल कोळेकर, संदीप नलावडे, विक्रम खोत, सागर टिंगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.