Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना 'ईडी'ने केली अटक!

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना 'ईडी'ने केली अटक!


नवी दिल्ली :  दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनाल अटक केली आहे.

मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी आज ईडीने आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला होता. ईडी मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये संजय सिंह यांचेही नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने संजय सिंह यांची जवळपास दहा तास चौकशी केली होती. सध्या संजय सिंह त्यांच्या घरी हजर आहेत. चौकशीनंतर ईडीने संजय सिंह यांना अटक केली आहे. यानंतर निमलष्करी दलाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता ईडीचे अधिकारी संजय सिंह यांना ताब्यात घेणार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही संजय सिंह यांच्या घराबाहेर जमायला लागले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.