Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात किती ठिकाणी छापल्या जातात चलनी नोटा? बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही!

भारतात किती ठिकाणी छापल्या जातात चलनी नोटा? बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही!


नवी दिल्ली : बनावट नोटा रोखण्यासाठी व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 2018मध्ये सरकारनं नोटाबंदी केली होती. तेव्हा चलनात असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीनंतर पाचशे रुपयांची नवीन नोट छापण्यात आली तर एक हजाराची नोट पूर्णपणे बाद करून त्याऐवजी दोन हजार रुपयांची नवीन नोट छापण्यात आली. या वर्षी, 19 मे रोजी आरबीआयनं दोन हजार रुपयांच्या नोटाही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून दोन हजार रुपयांची नोट व्यवहारामध्ये क्वचितच दिसत होती. आरबीआयनं या नोटांची छपाई फार पूर्वीच बंद केल्याचंही म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे नोटा कुठे छापल्या जातात?

भारतीय चलन छापण्याचं काम भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक करते. ज्यासाठी देशभरात चार छापखाने आहेत. या ठिकाणीच नोटा छापल्या जातात आणि भारतीय चलनातील नाणीही चार टांकसाळीत बनवली जातात. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील नोटा छापण्याच्या उद्देशाने 1926 मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे एक प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये 10, 100 आणि 1000 रुपयांच्या नोटा छापण्याचं काम सुरू करण्यात आलं. मात्र, त्यानंतरही काही नोटा इंग्लंडमधून आयात करण्यात आल्या होत्या. सन 1947 पर्यंत केवळ नाशिकमधील प्रेस नोटा छापण्याचं काम करत होती. त्यानंतर 1975 मध्ये मध्य प्रदेशातील देवास येथे देशातील दुसरी प्रेस सुरू झाली आणि 1997 पर्यंत या दोन्ही प्रेसमधून नोटा छापल्या जात होत्या, 'एबीपी'नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

1997 मध्ये भारत सरकारनं अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील कंपन्यांकडून नोटा मागवायला सुरुवात केली. 1999 मध्ये कर्नाटकातील म्हैसूर आणि 2000मध्ये पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे नोटांच्या छपाईसाठी प्रेस सुरू करण्यात आल्या. सध्या भारतात नोटा छापण्याचे चार छापखाने आहेत. देवास आणि नाशिक येथील प्रेस 'सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'च्या नेतृत्वाखाली काम करतात. यावर अर्थ मंत्रालयाचं नियंत्रण आहे. सालबोनी आणि म्हैसूरची प्रेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उपकंपनी 'भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रा प्रायव्हेट लिमिटेड'द्वारे चालवल्या जातात.

नोटांच्या छपाईसाठी परदेशातून येतो कागद

भारतीय चलनी नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा बहुतांश कागद जर्मनी, ब्रिटन आणि जपानमधून आयात केला जातो. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 टक्के भारतीय चलनी नोटा परदेशातून येणाऱ्या कागदावर छापल्या जातात. भारतात होशंगाबाद येथे 'सिक्युरिटी पेपर मिल' नावाची एक मिल आहे. तिथे नोटा आणि स्टॅम्पसाठी कागद बनवला जातो. नोटांमध्ये वापरण्यात येणारी विशेष शाई स्वीस कंपनी SICPA कडून खरेदी केली जाते. काही वर्षांपूर्वी, आरबीआयची उपकंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट प्रिंटिंगनं (BRBNMPL) कर्नाटकातील म्हैसूर येथे वर्णिका नावाचं शाई उत्पादन युनिट स्थापन केलं आहे. देशाला नोटांच्या छपाईमध्ये स्वावलंबी बनवणं हा त्यामागचा उद्देश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.