Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हिलचे अधिष्ठाता हटाओ - सिव्हिल बचाओ

सांगली सिव्हिलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकरांना हटाओ - सिव्हिल बचाओ 


- सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांची मागणी

सांगली : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात औषधांच्या तुटवडयासह अनेक सोयीसुविधांचा अभाव असून याकडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदकर यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. 


शिवाय कर्मचाऱ्यांवरही त्यांचा वचक राहिलेला नाही. दररोज सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत सांगली सिविल हॉस्पिटल मध्ये अधिष्ठात्यांनी हजर राहणे गरजेचे असतानाही, नणंदकर हे पूर्ण दिवस मिरज मेडिकल कॉलेजमध्ये बसलेले असतात आणि कर्मचाऱ्यांना विविध फायलींवर सह्या घेण्यासाठी मिरजला बोलावून घेतात.तरीही दिवसभर कागदपत्रांवर सह्या होत नसल्याने कर्मचाऱ्याला दिवसभर सदर हॉस्पिटल मध्ये ताटकळत वाट बघत बसावे लागते .त्यामुळे अशा अकार्यक्षम अधिष्ठात्यांना बदलून त्या ठिकाणी कार्यक्षम अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनजी मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी व्यक्त केली आहे .

 दरम्यान औषधांचा तुटवडा ,सोयी सुविधांचा अभाव ,रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असून या सर्वांकडे अधिष्ठाता डॉक्टर नणंदकर यांचे दुर्लक्ष होत असल्याने डीन हटाओ सिव्हिल बचाओ ही मोहीम हाती घेणार असल्याचेही मनोज भिसे यांनी म्हटले आहे .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.