Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू पिणे स्वस्त, भाकरी खाणे महाग, जीएसटी कौन्सीलच्या बैठकीत निर्णय

दारू पिणे स्वस्त, भाकरी खाणे महाग, जीएसटी कौन्सीलच्या बैठकीत निर्णय

देशातील महागाई कमी करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या केंद्रातील मोदी सरकारने शनिवारी दिल्लीत झालेल्या जीएसटीच्या बैठकीतही दिलासा दिला नाही. आज पार पडलेल्या जीएसटीच्या बैठकीत अनेक घोषणा करण्यात आल्या असून त्यातून सर्वसामान्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. ज्वारी, बाजरी, रागीच्या पॅक्ड पिठांवर पाच टक्के जीएसटी लावला आहे. तर मानवी वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या डिस्टिल्ड अल्कोहोल (दारू) ला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच दारू स्वस्त केली जाणार आहे.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची 52 वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. थंडीच्या महिन्यात ज्वारी, बाजरी आणि रागीच्या भाकरी खाणे जास्त पसंत केले जाते. या पॅक्ड पिठांवर आता 18 टक्केऐवजी 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. जे पीठ पॅक्ड (ब्रॅण्डेड) नसेल त्यावर शून्य टक्के जीएसटीची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए) वर कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारकडे सोपवला आहे. सरकारने घरोघरी पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता सेवा, कचरा व्यवस्थापन आणि झोपडपट्टी सुधारणा यावरील खर्च करमुक्त केला आहे. यासोबतच जीएसटी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये सुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. आता अध्यक्षांचे कमाल वय 67 ऐवजी 70 वर्षे असेल, तर सदस्य 65 ऐवजी 67 वर्षे वयापर्यंत सेवा करू शकतील.


रेल्वेने मालाची वाहतूक करणे होणार महाग

जीएसटी बैठकीत रेल्वेद्वारे सर्व वस्तू आणि सेवांच्या पुरवठय़ावर कर लावण्याचा आणखी एक निर्णय घेतला आहे. या सर्वांवर फॉरवर्ड चार्ज यंत्रणानुसार कर आकारला जाईल, ज्यामुळे रेल्वेला आयटीसीचा लाभ घेता येईल आणि त्याची किंमत कमी होईल.

दारू पिणे स्वस्त होणार

मानवी वापरासाठी वापरल्या जाणाऱया डिस्टिल्ड अल्कोहोलला जीएसटीमधून सूट दिली आहे. तर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलवर (ईएनए) वर आधीच्याप्रमाणे 18 टक्के जीएसटी कायम ठेवला आहे. त्याचबरोबर दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱया मोलॅसिसवरील जीएसटी दरही कमी करण्यात आला आहे. पूर्वी 28 टक्के जीएसटी आकारला जात होता, आता 5 टक्के दराने जीएसटी आकारला जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.