Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली काँग्रेसमधील वाद पेटला; 'या' नेत्यांमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावरून जुंपली

सांगली काँग्रेसमधील वाद पेटला; 'या' नेत्यांमध्ये रावण दहनाच्या कार्यक्रमावरून जुंपली



आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यातूनच आता मोठी सत्ता स्पर्धा पाहावयास मिळत आहे. सांगलीत आगामी निवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेक दावेदार असल्याने आता प्रत्येकालाच आमदार झाल्यासारखे वाटत आहे.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये कधीच वाद होत नाही असे सांगितले जात असले तरी ही मंडळी एकमेकांना भिडण्याची भाषा करत असल्याने निवडणुकीपूर्वीच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, विशेषतः सोशल मीडियावर एकमेकांवर रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आरोप -प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात काँग्रेसअंतर्गत वाद रंगण्याची शक्यता आहे.

सांगली महापालिकेतील माजी नगरसेवक राजेश नाईक हे स्वीकृत नगरसेवकपद न मिळाल्याने नाराज होते. राजेश नाईक यांनी मदन पाटील गटापासून अलिप्त राहून रावण दहन कार्यक्रमास विशाल पाटील यांना निमंत्रित केल्याने सांगली काँग्रेसमध्ये राजकीय दहनाचे वॉर सोशल मीडियावरून रंगले आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील सध्या शहरातील प्रत्येक कार्यक्रमांतून आघाडीवर असतात.

सध्या नवरात्राच्या निमित्ताने त्यांनी दुर्गा मंडळासमोर कार्यक्रम घेत ब्रँडिंग सुरू केले आहे. त्यासोबतच आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावर आरोप करीत रान पेटवले आहे. त्यांच्या फलकावर काही काँग्रेस नेत्यांचे छायाचित्र नसल्याचा आरोप केला जात आहे, तर दुसरीकडे आतापर्यंत रावण दहन कार्यक्रमाला मदन पाटील यांच्या कुटुंबीयांना बोलवणाऱ्या माजी नगरसेवक राजेश नाईक यांनी यावेळेस विशाल पाटील यांना बोलावून बॅनरवर त्यांचे छायाचित्र लावले आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेश नाईक यांच्याऐवजी मयूर पाटील यांचं नाव निश्चित केल्याने सर्वच काँग्रेसजणांवर राजेश नाईक नाराज आहेत. हारुण शिकलगार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत ते तटस्थ होते. 

दसऱ्यातील रावण दहन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसचे पदाधिकारी बिपीन कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली. एकदा राजकीय दहनानंतर रावण दहन करून लोकप्रतिनिधी म्हणून प्रस्थपित होता येत नाही, अशी पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी केली आहे.

काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांच्या जवळच्या व्यक्तीमध्ये वाद रंगल्याने काँग्रेसमध्ये मोठी असवस्था असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे, तर दुसरीकडे काँग्रेस एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले जात आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.