Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली : महामार्ग पोलीस असल्याचे सांगत वाहनधारकांची लूट

सांगली : महामार्ग पोलीस असल्याचे सांगत वाहनधारकांची लूट


सागंली : महामार्ग पोलीस असल्याची बतावणी करून वाहन चालकांना लुटण्याचा प्रकार रत्नागिरी-नागपूर महामार्गावर उघडकीस आला असून या प्रकरणी तीन तरूणांविरूध्द मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवारी मिळाली.

मिरज-पंढरपूर मार्गावरील कुमठे फाटा येथे वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वाहनधारकांना अडवून पैसे उकळण्याचे प्रकार घडत होते. शनिवारी सतिश माळी यांचा डंपर (एमएच १० बीआर २९९९) अडवून पैशांची मागणी करण्यात आली. आम्ही महामार्ग पोलीस असून वाहनाची कागदपत्रे अयोग्य असल्याचे कारण देत पैसे मागण्यात येत होते. या प्रकरणी सुशांत पाटील, पंकज पाटील व तेजस पाटील सर्व रा. सिध्देश्‍वर मंदिरासमोर बुधगाव या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.