Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त

निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त

हैदराबाद:  देशातीले ५ राज्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक प्रचारांपासून ते कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यापर्यंत, त्यांच्यासाठी पार्ट्या आणि पैशांचे वाटप करण्यापर्यंतचं नियोजन करण्यात येत असल्याचं हळु हळु समोर येत आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगाणात ह्या निवडणुका पार पडत आहेत. तेलंगाणात सर्व ११९ विधानसभा जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी, स्थानिक मातब्बर प्रादेशिक पक्षांनी जोर लावला असून भाजप व काँग्रेसही जोरदारपणे मैदानात उतरली आहे. यादरम्यान, पोलिसांनी मोठी पैसे, सोनं आणि दारुच्या बाटल्यांचा मोठा साठा हस्तगत केला आहे.


तेलंगणात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, नियमांच्या पालनासाठी प्रशासनही सज्ज आहे. त्यातच, निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजतागायत पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७५ कोटी रुपये रोख, सोनं आणि मोठ्या प्रमाणात दारु पडकण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४८.३२ कोटी रुपये रोख, ३७.४ किलो सोनं आणि ३६५ किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच, ४२. २०३ कॅरेटचे हिरेही जप्त केले आहेत. या मौल्यवान वस्तुंची एकूण किंमत १७.५० कोटी एवढी आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राज्य आणि आंतरराज्यीय सीमांवर ४,७२ कोटी रुपयांची १,३३,८३२ लीटर दारु, २,४८ कोटी रुपयांचा ९०० किलो गांजा, ६२७ साड्या, ४३,७०० किलो तांदूळ, ८० शिलाई मशिनी, ८७ कुकर आणि दोन कार जप्त केल्या आहेत. दक्षिण भारतात निवडणूक काळात दारु, शिलाई मशिन, साड़ी आणि कुकर सहित घरगुती वस्तू वाटण्याचा प्रकार सर्रास घडतो. म्हणूनच, निवडणूक आयोग या घटनांवर लक्ष ठेऊन आहे.


११९ जागांसाठी सर्वच पक्षांची तयारी

दरम्यान, तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात ११९ जागांसाठी निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या निवडणूक प्रचाराचा जोर वाढवला आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख केसीआर (kcr) सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, पण २०१४ आणि २०१९ प्रमाणे यावेळीही त्यांना मोठी मेहनत करावी लागणार आहे. 'किंग' बनण्यासाठी काँग्रेस आणि भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर बसपा आणि AIMIM 'किंगमेकर' बनण्यासाठी उत्सुक आहे. येथे भाजपही उघडपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली होती, यावेळी भाजप आमदारांची संख्या दुहेरी आकड्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.