सांगलीत दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ
सांगली : भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा या घोषवाक्याने जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. दि. ३० आक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात या सप्ताहानिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
सोमवारी या सप्ताहाला जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी विविध शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये येथे भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. या सप्ताहात आकाशावाणीद्वारे भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तर मोबाईलवर मोठ्या प्रमाणात संदेश पाठवूनही जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरे, गावे येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आठवडा बाजार, गदीर्च्या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जनजागृतीसाठी ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये येथे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा, तालुका स्तरावर बार कौन्सील, बार असोसिएशन येथे बैठकांचे आयोजन करून चचार्सत्र घेण्यात येणार आहे. या सप्ताहानिमित्त एकता दौड, निबंध स्पधार्, लघुकथा लेखनाच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील नागरिकांनी या सप्ताहातील कायर्क्रमात सहभागी होऊन भ्रष्टाचारमुक्तीच्या लढ्यात साथ द्यावी. तसेच लाचेसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर माझ्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.