Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिसालाच लुटले.फक्त एक कॉल.क्षणात ८२ हजार गायब

पोलिसालाच लुटले.फक्त एक कॉल.क्षणात ८२ हजार गायब


लोकांचे सायबर गुन्हेगारीपासून रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांचीच लूट झाली तर त्याची जास्त चर्चा होते. आणि ज्या प्रदेशात काहीही घडू शकते अशा उत्तर प्रदेशात एका पोलिसालाच सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन लुटले आहे. या घटनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा येथील सायबर गुन्हेगारांनी एका पोलिसाची ८२ हजारांची फसवणूक केली आहे. शिवाय फसवणूक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सायबर गुन्हेगारांनी त्याला फोन केला आणि त्याच्या मुलाने एका स्पर्धेत सफारी कार जिंकल्यांचं सांगितलं. त्यानंतर गुन्हेगारांनी पोलीस कर्मचाऱ्याला आधार कार्ड आणि बँक तपशील पाठवायला सांगितले जेणेकरुन त्यांना ती कार त्यांच्याकडे पाठवता येईल. पोलिसाने सायबर गुन्हेगारांना सर्व माहिती पाठवताच त्यांनी पोलिसाच्या खात्यातून ८२ हजार रुपये काढून घेतले. पोलिस कर्मचाऱ्याला अकाऊंटमधील पैसे काढल्याचा मेसेज येताच त्याला धक्का बसला आणि त्याने लगेच आपले खाते बंद करून घेतले आणि थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली.

झारखंडमधील गुन्हेगार

या प्रकरणावर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी झारखंडमधील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये, असे आवाहन केले आहे. अशी फसवणूक झाल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनदेखील केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.