Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरात हादरलं! एकाच कुटुंबातील ७ जणांची सामूहिक आत्महत्या

गुजरात हादरलं! एकाच कुटुंबातील ७ जणांची सामूहिक आत्महत्या


गुजरातच्या सूरतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबातील सात सदस्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं आहे.
या घटनेतील मृतांमध्ये तीन मुलांहित सात जणांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीडिया वृत्तानुसार, सूरतमधील एका व्यक्तीने त्याची पत्नी, आई-वडील, एक मुलगा आणि दोन मुलींसोबत सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शांतिलाल सोलंकी यांनी आधी गळफास घेऊन जीवन संपवलं. तर कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून जीवन संपवलं, असा संशय व्यक्त केला जात आहे. सूरतच्या पालनपूर येथे ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सूरतच्या पालनपूर येथे ही घटना घडली. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पालनपूर पाटिया येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. शांतिलाल सोलंकी यांनी पत्नी, आई-वडील आणि तीन मुलांना विष दिलं. त्यानंतर शांतिलाल यांनी घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळाली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सामूहिक आत्महत्येच्या घटनेनंतर पालनपूर पाटिया येथे राहणाऱ्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. या ७ जणांनी सामूहिक आत्महत्या का केली, याचा तपास करण्यासाठी या ७ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. कुटुंबाची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरु केली आहे. मात्र, या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या का केली, याचा तपास अद्याप होऊ शकलेला नाही. तर या कुटुंबात काही वाद होते की आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, याचा तपास पोलीस आता करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.