Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरीट सोमय्यांची कोर्टात भंबेरी, त्या व्हिडीओवरून प्रश्नांचा भडिमार.

किरीट सोमय्यांची कोर्टात भंबेरी, त्या व्हिडीओवरून प्रश्नांचा भडिमार.


भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओमधील सत्य सांगताना बुधवारी उच्च न्यायालयात चांगलीच भंबेरी उडाली. न्यायालयाने समजून घ्यावं, असे सांगण्याची नामुष्की शेवटी सोमय्यांवर ओढावली. तरीही न्यायालयाने या संपूर्ण व्हिडीओवर प्रश्नांचा भडिमार केला.

हा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणारी लोकशाही वृत्तवाहिनी, एक यू-टय़ूब वाहिनी व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात सोमय्यांनी शंभर कोटी रुपयांचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर या दाव्यावर सुनावणी झाली.

या सुनावणीत सोमय्या व्हिडीओमध्ये नेमके काय करत आहेत याचे वर्णन न्यायालयाला सांगताना चांगलीच अडचण झाली. अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा वास्तव्याचा पत्ता मुंबईतील नसून संभाजीनगरचा असल्याने याबाबत स्वतंत्र अर्ज करण्यासाठी सोमय्यांच्या वतीने वेळ मागण्यात आला. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडय़ांसाठी तहकूब केली.

 

दानवे यांचे मुंबईत घर आहे. त्यामुळे सुनावणी मुंबईत होईल, असे सोमय्यांचे म्हणणे आहे. मुळात दानवे यांचे मुंबईत घर नाही. ते संभाजीनगरला राहतात. तसेच दानवे यांनी या व्हिडीओवर केवळ आपले मत दिले आहे, असे दानवे यांचे वकील मयूर खांडेपारकर यांनी निदर्शनास आणले. मग सुनावणी संभाजीनगरला होईल का, अशी विचारणा न्यायालयाने केली. दानवे यांचा पत्ता लिहिताना चूक झाली आहे. आम्ही चूक दुरुस्त करू, असे सोमय्यांचे वकील ऋषीकेश मुंदरगी यांनी स्पष्ट केले. सोमय्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतरच त्यावर आम्ही आमचे प्रत्युत्तर सादर करू. आताच आम्ही यावर भाष्य करणार नाही, असे अॅड. खांडेपारकर यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाचे प्रश्न

न्या. मोडक - व्हिडीओमध्ये काय आहे?

वकील - हा व्हिडीओ एका हॉटेलमधला आहे. सोमय्या संभाषण करत आहेत.

न्या. मोडक - समोरची व्यक्ती कोण आहे?

वकील - समोर एक महिला आहे.

न्या. मोडक - सोमय्या काय करत होते?

वकील - न्यायालयाने थोडं समजून घ्यावं.

न्या. मोडक - महिला आणि पुरुष सर्वसाधारणपणे बोलतातच. त्यात बदनामीसारखं काय आहे?

वकील - या व्हिडीओसंदर्भात वृत्तवाहिनीवर चर्चा झाली. हा व्हिडीओ वारंवार वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आला. सोमय्या यांनी अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप झाला. त्यामुळे अशाप्रकारे बदनामी करण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.