Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार..

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार..


मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणं हादरलं आहे. रविवारी (30 ऑक्टोबर 2023) मध्यरात्री खुनाच्या घटनेनं पुणे शहर हादरलं. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. मध्यरात्री अंदाजे 2 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अनिल साहू (वय 35) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेनं पुणं  पुरतं हादरलं असून परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.               

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अनिल साहू घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होता. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत होता, तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या. अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबियही घरातच होते. अज्ञात इसमानं गोळ्या झाडल्या आणि तिथून तात्काळ काढता पाय घेतला. हल्लेखोर पसार झाल्यानंतर अनिल साहू यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांनी तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहुचा आधीच मृत्यू झाला होता.


घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत, तपास सुरू केला. याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांकडून तपासची सूत्र वेगानं हलवली जात असून फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शिक्षणचं माहेर घर म्हणवणाऱ्या पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. चोऱ्या दरोडे यासोबतच हल्ले आणि खूनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.        


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.