Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत स्पीड ब्रेकरने घेतला बळी, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

सांगलीत स्पीड ब्रेकरने घेतला बळी, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद


सांगली : रस्ते अपघातांना आळा बसावा यासाठी शहरांतर रस्त्यांवर  सिग्नलवर, शाळा-कॉलेजेसच्या परिसरात असे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर्स टाकलेले दिसून येतात. मात्र आता याच स्पीड ब्रेकरने सांगलीत एकाचा बळी घेतला आहे. सांगलीत स्पीड ब्रेकर वरून दुचाकी वेगाने घेऊन जाणे एकाच्या जीवावर बेतले आहे. स्पीड ब्रेकरवर वेगाने गेल्याने दुचाकीवरील तोल गेल्याने आणि डोक्यावर पडल्याने सांगली मधील विजय मगदूम या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

सांगलीतील बिरनाळे कॉलेज समोरील असलेल्या स्पीड ब्रेकरवर रात्री 11 वाजता हा अपघात घडलाय.या संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आलाय. मृत  विजय मगदूम हे सांगलीतील एकता मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.रात्री बिरनाळे कॉलेजसमोरील स्पीड ब्रेकरवर त्यांची गाडी घरसली आणि ते गाडीत रस्त्यावर आदळले.  त्यांच्या डोक्यातून रक्तत्राव झाला. अपघातानंतर स्थानिक तरुण त्वरित धावले व त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विजय मगदूम हे सांगलीतील एकता मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. या स्पीड ब्रेकरमुळे आज मगदूम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


अपघातांना आमंत्रण देणारे

कधी कधी स्पीड ब्रेकर जास्त उंचीचे व कमी रुंदीचे असल्याने गतीरोधक नसून अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत.  दुचाकीस्वारांचा बऱ्याचदा तोल गेल्याने मागील सीटवर बसलेली व्यक्ती खाली पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.  स्पीड ब्रेकर्सवर चारचाकी वाहने बऱ्याचदा बंद पडल्याने अचानक थांबतात. अशावेळी मागून येणारी वाहने त्या वाहनांना धडकल्याच्या घटनाही घडत आहेत. स्पीड ब्रेकर्स टाळण्यासाठी काही दुचाकीस्वार बाजूने वाहने चालविण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. यावेळी अपघात झाल्याच्या घटनाही घडत आहेत.  


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.