Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेवानिवृत्ती निमित्त बन्सीलाल मांडवे यांचाजिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार

सेवानिवृत्ती निमित्त बन्सीलाल मांडवे यांचाजिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सत्कार

सांगली, दि. 3,  : जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी बन्सीलाल मांडवे हे नियतवयोमानानुसार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज त्यांचा जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्या हस्ते सत्कार करून जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांना ‍निरोप देण्यात आला. यावेळी माहिती अधिकारी एकनाथ पोवार यांच्यासह कार्यालयातील अमोल पाटील, शंकरराव पवार, सुधीर पाटील, सागर दळवी, नागेश वरूडे, प्रदीप थोरात तसेच सेवानिवृत्त कर्मचारी अरूण गाडेकर व अरूण कांबळे उपस्थित होते.

यावेळी श्री. मांडवे यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांचे जीवन सुखी, आनंदी व ‍निरोगी जावो अशा शुभेच्छा जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माहिती अधिकारी एकनाथ पोवार यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना दिल्या. श्री. मांडवे हे  28 नोव्हेंबर 19997 रोजी शासकीय सेवेत ‍जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे वाहन चालक या पदावर रूजू झाले होते. तद्नंतर ते ऑगस्ट 2002 मध्ये  बदलीने ‍जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे रूजू झाले होते.  मे 2010 ते  मे 2012 या कालावधीत त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूर येथेही सेवा बजावली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.