Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही' ; गोपीचंद पडळकर

'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही' ; गोपीचंद पडळकर 


शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते. ओरोस : आम्हाला आरक्षण देण्याची कोणत्याही सरकारला गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते आरक्षण आधीच आम्हाला दिलेले आहे. केवळ त्याच्या अंमलबजावणीची मागणी आमची आहे, असे स्पष्ट मत आमदार गोपीचंद पडळकर  यांनी व्यक्त केले. आता ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही. काहीजण आडवे येण्याची शक्यता आहे. त्यांनाही आडवे करत आरक्षण  मिळवायचे आहे, असे प्रतिपादनही धनगर समाज नेते आमदार पडळकर यांनी सिंधुदुर्गनगरीत केले.

सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात 'धनगर आरक्षण जागर यात्रा' पडळकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिवराज बीडकर, बाळा गोसावी, नवलराज काळे, राजेश जानकर, कानू शेळके, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, दीपा ताटे, किशोर वरक, सुरेश झोरे, बाळा कोकरे, देऊ जंगले, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुशील खरात, भरत गोरे आदी उपस्थित होते. यावेळी शामसुंदर मोडक, किशोर वरक, नवलराज काळे, कानू शेळके यांची भाषणे झाली.

पडळकर म्हणाले, '१९६१ पासून धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. मी, २०१८ मध्ये आंदोलन हातात घेतले. तेव्हापासून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु, शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते. धनगरांच्या बाजूने मी १७० पुरावे दिले आहेत. निकाल १०१ टक्के आपल्या बाजूने लागणार आहे; परंतु, मला शांत बसायचे नाही. मिळालेले आरक्षण लागू करणे, हा 'प्लॅन ए' आहे. रस्त्यावर उतरून लढाई करायची, हा 'प्लॅन बी' आहे. यासाठी राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यायचे आहे.''

अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी प्रस्ताव द्या

धनगर समाजाच्या वस्ती जोडणाऱ्या रस्त्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जोडरस्ते योजना' शासन आणत आहे. यासाठी अन्य दोन भटक्या विमुक्त जातीसाठी पाच हजार कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रस्ताव करावेत. जिल्ह्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या धनगर वस्तीत सामाजिक भवन उभारले जाणार आहे. धनगर समाजाला २५ हजार घरे दिली जाणार आहेत. घरकुल योजनेसाठी जागा नसल्यास शासन ५० हजार रुपये जागा खरेदी करण्यासाठी निधी देत आहे. याचा समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन पडळकर यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.