Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्विस बँकेतील खात्याची नवी यादी सरकारच्या हाती, कोण आहेत खातेदार?

स्विस बँकेतील खात्याची नवी यादी सरकारच्या हाती, कोण आहेत खातेदार?


स्वित्झर्लंडमधील स्वीस बँकेने भारतातील काही खातेधारकांची माहिती भारत सरकारला दिल्याची माहिती समोर येत आहे. काही बडे उद्योगपती, नेते आणि ट्रस्ट अशा शेकडो खात्यांची माहिती स्वीस बँकेने भारत सरकारला दिली आहे.

त्यानंतर आता भारत सरकारने सर्व खात्यांची तपासणी सुरू केली असून त्यात काही आर्थिक अनियमितता असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वीस बँकेने १०४ देशांतील सरकारांना तब्बल ३६ लाख खात्यांची माहिती दिली आहे. त्यात भारतातील शेकडो खात्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता देशातील आर्थिक गुन्हेगारांचे धाबे दणादण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वीस बँकेने भारतातील काही व्यक्ती, नेते आणि ट्रस्टच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली आहे. या खात्यांच्या व्यवहारांचा तपशील, नाव, पत्ता, शिल्लक रक्कम, उत्पन्न आणि कराची माहिती स्वीस बँकेकडून सरकारला देण्यात आली आहे. स्वीस बँक आणि भारत सरकार यांच्यातील माहितीचं हे पाचवं आदानप्रदान आहे. त्यामुळं आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशातील आर्थिक गुन्हेगारांवर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतंकवाद्यांना पैसा पुरवणे, करचोरी, आर्थिक पिळवणूक आदी गुन्ह्यांच्या तपासासाठी या माहितीचा वापर सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्यात स्वीस बँकेने नवीन खात्यांची माहिती भारत सरकारला दिली होती. पुढील वर्षी स्वीस बँकेकडून आणखी काही खात्यांची माहिती सरकारला दिली जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात स्वीस बँकेतील खात्यांमध्ये दोन लाखांची वाढ झाली आहे. मालदीव, कझाकिस्तान आणि ओमान या देशांतील लोकांनीही स्वीस बँकेत खाती उघडल्याची माहिती आहे. स्वीस बँकेने खात्यांची माहिती दिल्यानंतर संबंधितांनी आयकर भरताना या खात्यांची माहिती दिली आहे की नाही?, याची तपासणी केली जाणार असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.