भाजप आमदाराला गावातून हाकलले, जालन्यात मराठा तरुण आक्रमक
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील रोहिलागड गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन करण्यासाठी गेलेले भाजप आमदार नारायण कुचे यांना ग्रामस्थांच्या व मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी निघा… निघा… आमच्या गावातून निघा असे म्हणत कुचे यांना अक्षरशः गावातून हाकलले. गावकरी संतप्त झाल्याचे पाहून आमदार कुचे यांनी गावातून काढता पाय घेत तेथून पळ काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.