Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा समाज सांगली संस्थेस सर्वतोपरी मदत करू.. आमदार सुधीरदादा गाडगीळ

मराठा समाज सांगली संस्थेस सर्वतोपरी मदत करू.. आमदार सुधीरदादा गाडगीळ


दि. 14 ऑक्टोंबर 2023 मराठा समाज सांगली संस्थेस मा. आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. तसेच त्यांनी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची माहिती दिली. मुलीच्यासाठी वसतिग्रह व यूपीएससी, एमपीएससी करिता मुलाच्यासाठी सुसज्य वाचनालय सुरु करण्याचा मानस असल्याचे सागितले. संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड उत्तमराव निकम यांनी संस्थेच्या सर्व विभागाची थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी मा. आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी सर्वतोपरी मदत आपल्या मार्फत करू असे सागितले. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष रघुनाथराव पाटील तसेच कार्यकारणी सदस्य  अॅड संभाजीराव पाटील सावर्डेकर, बाबासाहेब भोसले, अॅड विलासराव हिरगुडे पवार तसेच विनायक निकम, भरत बरगे , दीपक झांबरे, दीपक सूर्यवंशी, टपाल तिकिटे संग्रहक गजानन पटवर्धन आदी उपस्थित होते...

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.