Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील शासकीय रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावल

शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील शासकीय रुग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावल 


नांदेडमध्ये रूग्णालयाच्या डीनला स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील शासकीय रूग्णालायातील हा धक्कादायक प्रकार आहे. हेमंत पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहे, त्यांनी रूग्णालयाच्या प्रमुखांना(डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपुर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 

नांदेडमधील जिल्हा शासकीय रूग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर कालपासून नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयात मृत्यू झाल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन एस.आर.वाकोडे यांना हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करायला लावली आहेत,आज(मंगळवारी) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. त्यामध्ये त्यांना रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे निदर्शनास आले. पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन (अधिष्ठाता) हे देखील होते. त्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर खासदार हेमंत पाटील यांच्यावर त्यांच्या या कृत्याबाबत टीका करण्यात येत आहे.

या घटनेबाबत बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, 'मी डीनचं समर्थन करत नाही. रूग्णालयाच्या डीनला असं वागवण्यापेक्षा शासनाकडून सफाईबाबत जे काही निर्णय घेणे अपेक्षित आहे. डीन काय करणार त्यामध्ये, शेवटी ते शासकीय रूग्णालय आहे. कामासाठी लोक कमी पडत असतील, जी मनुष्यबळाची करतरता आहे. त्यामध्ये डीन एकटे काय करतील. त्यासंदर्भात प्रशासन, सरकार यांनी लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत. डीनकडून सफाई करून किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्याने काय होणार आहे, ही कृती उचित नाही असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.'

तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी डीन यांच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या केबिनमध्ये जे स्वच्छतागृह आहे त्यापैकी एक बंद होते. तर एकामध्ये सामान भरून ठेवण्यात आले होते. बेसिन तुटले आहे. पाणी नाही, असं पाटील म्हणाले. 

बालकांचा वार्ड आहे, त्याठिकाणचे सर्व स्वच्छता गृह गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. पाणी नाही, स्वच्छता नाही, कोणतीही सोय नाही. प्रशासनाने जबाबदारीने ही कामे करायला हवी असंही हेमंत पाटील म्हणालेत.  सामान्याने कुठे जावं, ते प्रमुख आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, गर्भवती वार्डमध्ये दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, डीन यांनी रूग्णालयात फिरलं पाहिजे, परिस्थिती पाहिली पाहिजे असंही पाटील म्हणालेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.