Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली, दि. 27,  :  राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे शनिवार, दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, हेलिपॅड, पाषाण पुणे येथून हेलिकॉप्टरने कवठेमहांकाळ जि. सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता श्री महाकाली सहकारी साखर कारखाना कवठेमहांकाळ येथील हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने विद्यानगरकडे प्रयाण. सकाळी 10.40 वाजता कै. विवेक सुरेश तेली यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, स्थळ - सुशांत मंगल कार्यालयजवळ, विद्यानगर, कवठेमहांकाळ. सकाळी 11 वाजता श्री. दिनकर पाटील यांच्या ‍निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ - शिवतिर्थ बंगला, हरोली, ता. कवठेमहांकाळ. सकाळी 11.20 वाजता हरोली येथून मोटारीने श्री महाकाली सहकारी साखर कारखाना कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता श्री महाकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ येथील हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.