Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हा फोटो पाहिल्यावर पुन्हा कधी पनीर खाणार नाही, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

हा  फोटो पाहिल्यावर पुन्हा कधी पनीर खाणार नाही, सोशल मीडियावर होतोय व्हायरल


नवी दिल्ली : पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात त्यामुळे जीमधील लोकही प्रोटीनसाठी फक्त पनीर खातात.

पनीरची भाजी बनवली जाते, एवढंच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी पनीरपासून बनवल्या जातात. इतर पदार्थांनध्येही आवर्जुन पनीर टाकलं जातं. सध्या पनीर संदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्ही विकतचं पनीर खाताना 10 वेळा विचार कराल.

विकत गोष्टी घेताना अनेकदा स्वच्छतेबाबत विचार डोकवून जातात. हे स्वच्छ असेल ना, हे बनवताना स्वच्छता, साफ-सफाई पाळली गेली असेल ना? सोशल मीडियावर अनेक पदार्थ बनवताना होणाऱ्या निष्काळजीपणा बाबत फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक फोटो सध्या समोर आलाय ज्यामुळे पनीर आवडीनं खाणारे लोक पुन्हा विकत पनीर घेऊन खायचा विचारही करणार नाही.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, जाड, गुंडाळलेल्या चीजच्या ढिगाऱ्यावर एक व्यक्ती बसला आहे. त्याच्या वजनामुळे पनीर बनवण्यासाठी केलेल्या त्या लादीतून पाणी निघत आहे. हे पाहून कोणालाही किळस येईल. व्हायरल झालेला फोटो कानपूर, यूपी येथील आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र घटनेचे नेमके ठिकाण अद्याप स्पष्टपणे कळू शकलेले नाही.

दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी म्हटलं, स्थानिक डेअरी दुकानांमध्ये अशा घटना घडतात असतात. ब्रेड्स बनवतानाही असाच प्रकार दिसून येतो. अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो, व्हिडीओ कायमच समोर येत असतात. त्यामुळे तुम्हीही विकत गोष्टी खरेदी करत असाल तर सावधान. खरेदी करताना सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.