Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत

केवायसीच्या बहाण्याने लांबवलेले ४८ हजार तक्रारदारास परत


सांगली :  क्रेडीट कार्ड अॅक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर लिंक पाठवून त्याव्दारे बँक खात्यातील लांबविण्यात आलेले ४८ हजार रुपये सांगलीच्या सायबर पोलिसांनी तक्रारदारास परत मिळवून दिले.


आष्टा (ता. वाळवा) येथील मनोहर देशमुख यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले होते. यानंतर क्रेडीट कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी मोबाइलवर पाठविण्यात आलेली लिंक ओपन करून त्यावर माहिती भरण्यास सांगितले होते. यावर विश्वास ठेवून देशमुख यांनी माहिती भरली मात्र, यानंतर त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढण्यात आली होती.

फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच देशमुख यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबरच्या पथकाने याचा तपास सुरू केला असता, एका ऑनलाईन खरेदीच्या संकेतस्थळाने ही रक्कम काढून घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत ही रक्कम तात्काळ परत मिळवली. सायबर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रोहिदास पवार, करण परदेशी, अजय पाटील आदिनी ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.