Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांची आमदार गाडगीळ यांच्यावर केलेली टीका हास्यस्पद; दीपकबाबा शिंदे

पृथ्वीराज पाटील यांची आमदार गाडगीळ यांच्यावर केलेली टीका हास्यस्पद; दीपकबाबा शिंदे 


सांगली चे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या कामावर आणि आणलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून स्वतःला झळकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे.

मुळात महाविकास आघाडी ची सत्ता असताना यानी व महाविकास आघाडीच्या सांगलीतील इतर नेत्यांनी सांगलीच्या विकासासाठी काहीही काम केलेले नाही किंबहुना सुरू असलेली सर्व काम ठप्प पाडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता आमदार गाडगीळ यांनी केलेल्या कामाचे श्रेय मात्र स्वतः लाटण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटील करत आहेत.  स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले बघवत नाही अशी एकंदर सांगलीतील भाजप विरोधकांची मनस्थिती झालेली आहे.

गेल्या नऊ वर्षांमध्ये सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व गावे आणि सांगली शहरातील भाग यामध्ये विकासासाठी, आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी पाठपुरावा करून केंद्रातून आणि राज्यातून मोठ्या प्रमाणावर निधी आणलेला आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल चे नूतनीकरण तेथे आणलेली विविध वैद्यकीय उपकरणे, सांगलीतील झालेले नवीन पूल, रस्ते, महापालिकेसाठी विविध स्तरावर निधी आणण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी केलेला पाठपुरावा हे सगळे सांगलीतील मतदारांना माहिती आहे.

कित्येक वर्ष पेठ -सांगली रस्ता हा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला करता आला नाही हे सर्वश्रुत आहे. त्या रस्त्याची दुर्दशा सर्व सांगलीकराना ठाऊक आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी मंजुरी प्राप्त करून घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होत आहे.

याउलट पृथ्वीराज पाटील गेली काही वर्ष झालेल्या कामाचे श्रेय कसे लाटता येईल आणि  समाजा समाजामध्ये गैरसमज व ध्रुवीकरण निर्माण करून आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल इतकाच प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु सुज्ञ मतदार हे सर्व पुरते ओळखून असल्यामुळे त्यांनी आमदार गाडगीळ यांच्यावर केलेल्या टीकेचा काडीचा परिणाम होणार नाही याची नोंद घ्यावी. 

तसेच केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे जिल्ह्यातील किंवा शहरातील विकास कामात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बरोबरीने खासदार संजय काका पाटील आणि पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांचा पण सहभाग आहे, ते गाडगीळ यांनी कधीच नाकारलेले नाही आणि हे सर्व भारतीय जनता पक्षाचा भाग असल्यामुळे विकासाचे सगळे श्रेय भारतीय जनता पक्षाला जाते त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी हे असल्या टीकेचे केविलवाणे प्रयत्न बंद करावेत...



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.