Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधी यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची स्फोटक मुलाखत

राहुल गांधी यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची स्फोटक मुलाखत

पुलवामा हल्ल्याचा राजकारणासाठी उपयोग करून भाजपने 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणुका जिंकल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त सहा महिने राहिले आहेत. लिहून घ्या, मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाहीत. यावेळी भाजपचा दारुण पराभव होईल, असा दावा जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या मुलाखतीत केला आहे. 

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी मलिक यांनी कश्मीरमधील परिस्थिती, पुलवामा हल्ला, एमएसपी, जातनिहाय जनगणना, गौतम अदानी, शेतकरी आंदोलन, जीएसटी, मणिपूर हिंसाचार आदी प्रश्नांना रोखठोक उत्तरे देत पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या छुप्या राजकीय मनसुब्यांची पोलखोल केली. मलिक यांच्यासोबत 28 मिनिटे झालेल्या चर्चेचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवर शेअर केला आहे.

ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी नॅशनल कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करीत होते. मी अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 5 ते 6 वाजता मला पह्न आला. मी मोदींना म्हटले सरकारच्या चुकीमुळे इतके जवान मारले गेले. मोदींनी मला शांत बसायला सांगितले. अजित डोवाल यांनीही मला गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनंतर सर्जिकल स्ट्राइक करीत पुलवामा हल्ल्यातील जवानांना विसरू नका असा गाजावाजा केला, असे मलिक म्हणाले. 'अग्निवीर' सेवा आणून जवानांची वाट लावली आहे. आता ते शेतकऱयांना देशोधडीला लावत आहेत. एमएसपी लागू केल्याशिवाय शेतकऱयांचे भले होणार नाही. जम्मू-कश्मीरचे लोक हे प्रेमळ आहेत. तुम्ही तिथल्या लोकांवर सक्तीने कुठलाही निर्णय लादू शकत नाही, असे मलिक म्हणाले.


अदानी यांच्याकडे जो पैसा आहे तो सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच आहे. अदानींकडे इतका मोठा पैसा आला कुठून? असे मलिक म्हणाले. राजकारणात शोबाजी करण्यात मोदी खूप हुशार आहेत. कोणत्या मुद्दय़ाचे इव्हेंट कसे करायचे हे त्यांना चांगलेच माहीत आहे. महिला आरक्षणाबाबत त्यांनी तेच केले. महिलांना यातून काही फारसे लाभ मिळणार नाहीत. पण मोदींनी आपण किती मोठे काम केले हे भासवण्याचा प्रयत्न यातून केला. संसदेची जुनी इमारत खूप मजबूत आहे, पण मोदींनी नवी इमारतीची पायाभरणी केली. मोदींची फसवेगिरी जनतेला आता कळून चुकली आहे. त्यामुळे या शोबाजीचा त्यांना फायदा होणार नाही, असेही मलिक म्हणाले.

पुलवामा हल्ल्याला पेंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. पंतप्रधान मोदींनी या हल्ल्याचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. मोदींनी निवडणुकीतील अनेक भाषणांत सांगितले की, मतदानाला जाताना पुलवामा हल्ला लक्षात ठेवा. त्यावेळेस माझ्या डोळय़ात अश्रू होते, असे मलिक म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.