Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तामिळनाडूमध्ये दोन फटाका कारखान्यांत मोठा स्फोट; १४ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमध्ये दोन फटाका कारखान्यांत मोठा स्फोट; १४ जणांचा मृत्यू


चेन्नई-तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी भागात मंगळवारी संध्याकाळी दोन फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात १४ जणांचा मृत्यू झाला.

या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पहिला स्फोट श्रीविल्लीपुथूर जवळील रेंगापलायम गावात दुपारी २.३० च्या सुमारास झाला, त्यात १३ कामगारांचा मृ्त्यू झाला. कारखान्याने आवश्यक परवानगी न घेताच एका खोलीत फटाक्यांची साठेबाजी केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

मिळालेली माहिती असी, "फटाक्यांचा अचानक स्फोट झाला, त्यामुळे घटनास्थळी असलेल्या १५ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला. जखमींना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत केवळ आठ मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.


हा मालक पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संस्थेच्या परवान्यासह फटाके युनिट चालवत होता, पण त्याच ठिकाणी ठेवण्याची आणि पॅक करण्याची परवानगी नव्हती, असे अधिकाऱ्याने सांगितले. "मालकाला अटक करण्यात आली आहे आणि त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरा अपघात किचनाइकेनपट्टी गावात झाला, जिथे रसायन मिसळताना एका कामगाराचा मृत्यू झाला. हे देखील एक परवानाकृत युनिट होते. दोन्ही कारखाने जवळ नव्हते.

मुख्यमंत्री एमके स्टेन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपये देण्याची घोषणा केली. जिल्ह्याचे महसूल अधिकारी या दोन्ही अपघातांची सखोल चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार आहेत. नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी कामाला वेग येत असल्याने ऑक्टोबरमधील फटाका युनिटमधील हा तिसरा मोठा अपघात आहे. शिवकाशी येथील १०० वर्ष जुना फटाका उद्योग भारतात बनवलेल्या फटाक्यांपैकी ९०% फटाके बनवतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.