Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विलिंग्डन महाविद्यालयात जातपडताळणी शिबीर संपन्न

विलिंग्डन महाविद्यालयात जातपडताळणी शिबीर संपन्न


सांगली, दि. 11, : विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथे जातपडताळणीचे विशेष शिबीर संपन्न झाले. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सांगली जिल्हा जातपडताळणी प्रमाणपत्र समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी जातपडताळणी प्रक्रियेबाबत पीपीटीच्या माध्यमातून अतिशय सोप्या भाषेत 11 वी व 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
  विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ गावी जात प्रमाणपत्र काढून त्या जिल्ह्याच्या समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. आपल्या जात प्रमाणपत्रावरील नोंदी योग्य आहेत काय याची खात्री करावी. प्रवेश प्रक्रियेच्या 5 महिन्यांपूर्वी अर्ज सादर करावा. मानीव दिनांकापूर्वीचा सर्वात जुना पुरावा हा महत्वाचा आहे. तसेच मूळ कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वतः बदल करू नये. महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असल्यास त्याला महाराष्ट्र राज्यातील लाभ मिळतील. तसेच ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावीत व त्यानंतर 30 दिवसाच्या आत समिती कार्यालयात अर्ज आणून द्यावा. त्यावेळी सर्व कागदपत्रांच्या  मूळ व सुस्पष्ट प्रति सादर करणे आवश्यक आहे. अर्ज कसा भरावा, वंशावळ, प्रतिज्ञापत्र कसे करावे अशा विविध मुद्यांची सविस्तर माहिती  उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली. तसेच लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन  करून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी  संशोधन अधिकारी संभाजी पोवार व महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर, उप प्राचार्य श्री. कुंभार, सीमा पवार यांचे सहकार्य लाभले. कार्यालयीन व्यवस्थापक अनिल कांबळे, निलेश पाटील, अजित माने यांनी विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारले. समतादूत संयोगीता हेरकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज जाग्यावरच स्वीकारले.  यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.