Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गंभीर भाजलेल्या बालकावर मिरज शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार

गंभीर भाजलेल्या बालकावर मिरज शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार


सांगली दि. 31  : गंभीर भाजलेल्या बालकास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे यशस्वी उपचार करून त्याला काल ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घरी सोडण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.

याबाबत माहिती देताना डॉ.नणंदकर यांनी सांगितले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज रुग्णालयामध्ये दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी मिरज येथे राहणारा 10 वर्षाचा बालक घराच्या छतावर खेळत असताना  विद्युत वाहिनीशी संपर्क आल्यामुळे तो अंदाजे ७० टक्के भाजला गेला होता, त्यावेळी तो बेशुध्द अवस्थेत आढळून आला. तातडीने नातेवाईकांनी त्यास जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये नेले असता रुग्णाची गंभीर अवस्था पाहून त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे उपचारासाठी पाठवले.

या रुग्णालयामध्ये बालक दाखल झाल्यानंतर त्याच्यावर डॉ. प्रशांत दोरकर, शल्यचिकीत्साशास्त्र विभाग व त्यांचे सहकारी यांनी त्वरीत अत्यावश्यक उपचार सुरु केले. उपचारासाठी बालरोग तज्ज्ञ प्राध्यापक, डॉ. दिपा फिरके व डॉ. होंबाळकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी व उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे तसेच अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांचे मार्गदर्शन मिळाले.  रुग्णावर तातडीने उपचार करून त्याला जीवनदान दिल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टर्स, स्टाफ व प्रशासन यांचे मनापासून आभार मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.