Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चांदणी चौकातील खोदलेला रस्ता एक आठवड्यात पूर्ण नाही झाल्यास महापालिका अभियंतास खोदलेल्या रस्त्यात गाडणार ; राज्य प्रवक्ते. संतोष पाटील

चांदणी चौकातील खोदलेला रस्ता एक आठवड्यात पूर्ण नाही झाल्यास महापालिका अभियंतास खोदलेल्या रस्त्यात गाडणार ; राज्य प्रवक्ते. संतोष पाटील

गेल्या अनेक महिन्यापासून चांदणी चौक ते दमानी हायस्कूल, विकास चौक पर्यंतचा अंदाजे एक किलोमीटर रोड गेल्या दोन-तीन महिन्यापासून तीन फुटापर्यंत खोदून ठेवला आहे.विशेष करून या भागांमध्ये अनेक प्रकारचे रुग्णालय,मोठी हॉस्पिटल,हॉटेल्स व अनेक ऑफिस या ठिकाणी आहेत तसेच या ठिकाणी शेकडो विद्यार्थी असलेले दमानी हायस्कूल, मालू हायस्कूल लहान गट.मोठा गटाचे. इंग्लिश स्कूल,अनेक वर्गाचे क्लासेस हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. हजारो विद्यार्थ्यांना या खोदलेल्या रस्त्यातून कसेतरी चालत जावे लागते. या रस्त्यात साठलेल्या पाण्यामुळे डास निर्माण होऊन त्या ठिकाणी डेंगू व मलेराईची साथ पसरू लागले आहे.राज्य व केंद्र सरकारने 

महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या किंवा राज्यातील ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सांगली महापालिकेला सध्या नगरसेवक नसल्यामुळे महापालिकेचा सर्व कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे.त्यामुळे हम करोसे कायदा व त्यांना कोण मालक विचारण्यास नसल्यामुळे प्रशासनाच्या मागे दात आल्यासारखे अधिकारी वागू लागले आहेत.त्यामुळे गेले अनेक महिने उकरून ठेवलेला रस्ता अनेक ज्येष्ठ नागरिक,महिला, मुली,लहान मुले  जाता येता खोदलेल्या रस्त्यात पडत आहेत  अनेक वेळा मोटरसायकली व चार चाकी गाड्या खड्ड्यात पडून एक्सीडेंट होत आहेत. अनेक विद्यार्थी पडून जखमी होत आहे. 

गुरुवारचा मोठा बाजार असल्यामुळे त्या ठिकाणी  या भागातील नागरिक, महिला, ग्रहणी,भाजपाला खरेदीसाठी  येत असतात अनेक दिवस उलटूनही खोदलेला रस्ता दुरुस्त न केल्यामुळे चांदणी चौकातील सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ह्या रस्त्याचं खोदून ठेवलेलं काम पुढील एक आठवड्यापर्यंत नाही झाल्यास. चौकातील सर्व नागरिकांना घेऊन महापालिका अभियंतास उकरून ठेवलेल्या रस्त्यामध्ये गडणार. असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी चांदणी चौकात खोदून ठेवलेल्या रस्त्यातूनच आज इशारा दिला आहे. या वेळेला सागर साळुंखे,ज्ञानेश्वर केंगार,विशाल रजपूत,असलम शेख,राजू पाटोळे, खुदबुद्दीन मुजावर,मुपीत कोळेकर,लाला पानपट्टी वाला यशवंत नंदे, सुरेश कांबळे,सचिन आरबोळी तसेच चांदणी चौकातील अनेक दुकानदार,व्यापारी उपस्थित राहून खोदलेल्या खड्ड्यामध्ये सांगली महापालिकेचा निषेध व्यक्त केला .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.