Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक..८ वेळा ट्रॅक्टरने चिरडून हत्या...जमीनीच्या वादातून घडली घटना

धक्कादायक..८ वेळा ट्रॅक्टरने चिरडून हत्या...जमीनीच्या वादातून घडली घटना

राजस्थानमध्ये भरतपूर येथील बयाना या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जमीनीच्या वादातून एकाला ८ वेळा ट्रॅक्टरच्या खाली चिरडले गेले. ही घटना अंगावर काटे आणणारी आहे.

जमीनीच्या वादातून भांडणे होतात. त्यातून काही ठिकाणी मारामा-या होतात. तर काही प्रकरणे न्यायालयात जातात. पण, या ठिकाणी थेट ट्रॅक्टरने हत्या करण्यात आली ही सुद्दा भंयकर अशी आहे. त्यामुळे संपूर्ण राजस्थान या घटनेने हादरले आहे.

बयाना गावात बहादूरसिंह गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात अनेक दिवसापासून जमिनीवरुन वाद सुरू आहे. या वादात एकाने थेट ४५ वर्षीय निरपत गुर्जरला ट्रॅक्टरने चिरडून त्याची हत्या केली. चार दिवसांपूर्वीही दोन्ही गटांमध्य मारामारी झाली होती, त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार रस्सीखेच सुरु असतांना ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.