Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंडियाविरुद्ध छुपा अजेंडा, एनसीईआरटी पुस्तकांत भारत!

इंडियाविरुद्ध छुपा अजेंडा, एनसीईआरटी पुस्तकांत भारत!

नवी दिल्ली : भारत हे शतकानुशतके जुने नाव आहे. भारत हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील 'इंडिया' नाव बदलून भारत करण्याची शिफारस बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली. एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे.

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत इंडियाऐवजी भारत नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंडियाऐवजी भारत नावाचा अवलंब केला होता.

अभ्यासक्रमात काय असेल?

सर्व अभ्यासक्रमांमध्ये 'प्राचीन इतिहासा'ऐवजी 'शास्त्रीय इतिहासा'चा तसेच भारतीय ज्ञानप्रणालीच्या समावेशाचीही शिफारस करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये 'इंडिया'ऐवजी भारत नाव ठेवण्याची शिफारस काही महिन्यांपूर्वीच केली होती, अशी माहिती समितीचे प्रमुख इसाक यांनी दिली.

विरोधकांची टीका; सरकार घाबरले

केंद्र सरकारला आव्हान देण्यासाठी 'इंडिया' आघाडी नावारूपाला आल्यापासून सरकार घाबरले आहेत. भारत आणि इंडिया ही नावे संविधानसंमत असतानाही इंडियाला हटविण्याच्या प्रयत्नांतून 'इंडिया' आघाडीविषयीची त्यांची भीती स्पष्टपणे जाणवत असल्याचा टोला आपने लगावला.


शिफारस देणाऱ्या समितीत कोण?

पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील समितीत आईसीएचआरचे अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, जेएनयूच्या प्राध्यापिका वंदना मिश्रा, डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू वसंत शिंदे, शिक्षिका ममता यादव यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया घाईची ठरेल : एनसीइआरटी

एनसीईआरटीचा नवा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या बैठकीही होऊ घातल्या आहेत. सध्या या शिफारशीवर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा स्थितीत यावर प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल, असे एनसीईआरटी स्पष्ट केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.