एकीकडे टाळ्यांचा कडकडाट अन् दुसऱ्याचं क्षणी भयानक अपघात; व्हिडिओ पहा
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, हे व्हिडीओ कधी हसवणारे असतात तर कधी अंगावर काटा आणणारे अपघाताचे असतात. सर्कस म्हंटलं की वेगवेगळे स्टंट आलेच. या सर्कसमध्ये वेगवगळे स्टंट करताना बऱ्याचदा तुम्ही तिथल्या खेळाडूंचे अपघातही झालेले पाहिले असतील. कितीही तरबेज हे खेळाडू असले तरीही, छोट्याश्या चुकांमुळे हे अपघात होतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सर्कसमध्ये खूप उंचावर हे खेळ सुरु असतात.
कधी एखाद्या दोरीचा आधार घेऊन, तर कधी लोंखडी स्टँडवर हे स्टंट करतात. यामध्ये कितीही रिस्क असली तरीही शेवटी पोटासाठी हे कलाकारांना, खेळाडूंना करावंच लागतं. दरम्यान अशाच एका सर्कसमध्ये कलाकार आपली कला सादर करताना, मोठा अपघात झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
२९ फुटावरु थेट खाली
या धक्कादायक अपघातात हा कलाकार २९ फुटावरु थेट खाली कोसळला, यावेळी प्रेक्षकांमध्येही गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका दोरीला लोंबकळत त्याने झोका घेऊन हात सोडला आणि हवेत तरंगत तो दुसऱ्या टोकावर चालला होता. तिथं तो पोहोचला देखील मात्र, त्याच्या हातांची घट्ट पकड न बसल्यामुळे त्याचा तोल गेला आणि उंचावर उभं राहण्यासाठी असलेलं स्टँडही कोसळलं, काही समजायच्या आतच हा कलाकार २९ फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर तो जोरदार व्हायरल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.