Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, कंत्राटी नोकर भरतीविरोधात भडका

सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, कंत्राटी नोकर भरतीविरोधात भडका 


पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज चंद्रकांत पाटील प्रथमच सोलापूर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. पंत्राटी नोकरभरती आणि खासगीकरण, पंत्राटीकरणाच्या मुद्दय़ावरून हा प्रकार घडला असून, शाई फेकणारा 'भीम आर्मी'चा कार्यकर्ता अजय मैंदर्गीकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुद्द पोलीस आयुक्त बंदोबस्तासाठी असताना पालकमंत्र्यांवर शाईफेक झाल्याने खळबळ उडाली आहे.

खासगीकरण, पंत्राटीकरण, आरक्षण, स्थानिक मुद्दय़ांवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपवर तरुणांचा अधिक रोष आहे. पालकमंत्री पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱयांची पळापळ झाली. शाईफेकीच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱया शासकीय बैठकीकडे सर्वांचे लक्ष असून, यासाठी माध्यमांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.