Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान मोदींच्या शिर्डी दौऱ्यावर हायकोर्टाची टांगती तलवार! काय आहे प्रकरण? वाचा



अहमदनगर,  : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डीला येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मोदींच्या या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे.

26 ऑक्टोबरला मोदी शिर्डीत विविध कार्यक्रमांसाठी येणार आहेत. मात्र, ज्या दर्शन रांगेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत, त्याला अद्याप हायकोर्टाने परवानगी दिलेली नाही.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते दर्शन रांगेचे उद्घाटन होणार का?
तदर्थ समितीने दर्शन रांगेच्या उद्घाटनाला परवानगी दिली आहे. मात्र, हायकोर्टाने अद्याप परवानगी दिलेली नाही. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी ही माध्यमांना माहिती दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दर्शन रांगेचे उद्घाटन होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. साई संस्थानने भाविकांसाठी बांधलेली वातानूकुलित दर्शन रांग, शैक्षणिक संकुल, निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण आणि विमानतळ इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साई संस्थानवर कार्यरत असणाऱ्या तदर्थ समितीने उद्घाटन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, हायकोर्टाने अद्याप परवानगी दिलेली नाही. उद्या हायकोर्टाने परवानगी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित होणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेत चोख नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता हायकोर्ट दर्शन रांगेच्या उद्घाटनाची परवानगी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा 26 ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे 30 ते 35 हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.