Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्जदारांचा हिरमोड, व्याजदरात कपात नाहीच; आरबीआयने जाहीर केले पतधोरण

कर्जदारांचा हिरमोड, व्याजदरात कपात नाहीच; आरबीआयने जाहीर केले पतधोरण


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ने आज नवीन पतधोरण जाहीर केले. पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो रेट 'जेसे थे' ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. रेपो रेट स्थिर ठेवल्यामुळे दसरा, दिवाळी आणि त्यानंतर नाताळ या सणवारांआधी व्याजदरात कपात होण्याची आशा माळवली आहे. मात्र स्थिर ठेवल्याने गृहकर्ज घेणाऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची आज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घोषणा केली. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, व्याजदर 6.5 टक्क्यांवर स्थिर राहतील. आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल न केल्याने कर्ज महाग होणार नाही आणि ईएमआय भरणाऱ्यांवर बोजा वाढणार नाही.

आरबीआयच्या पतधोरणाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा पैकी पाच सदस्य रेपो रेटमध्ये बदल न करण्याच्या बाजुने होते, असेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. तसेच महागाईवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात डाळींची लागवड कमी झाल्याने महागाईचा धोका वाढल्याचे ते म्हणाले. तसेच सर्व बाबींचा विचार करता चालू आर्थिक वर्षात जीडीपी 6.5 टक्के आणि पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 6.6 टक्के राहू शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेल्या वर्षापासून सातत्याने वाढणाऱ्या महागाई दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयने व्याजदरात वाढ केली होती. मे 2022 पासून सातत्याने वाढ केल्यामुळे रेपो रेट 6.5 टक्क्यांवर पोहोचला होता. आरबीआयने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो रेटमध्ये 2.5 टक्के वाढ केली होती. मात्र त्यानंतर रेपो रेटमध्ये बदल करण्यात आला नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.