Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिष्ठाता विरुद्ध तक्रारीचा पाऊस अधिष्ठात्यांना रोज उपस्थित राहण्याची सूचना; हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिष्ठाता विरुद्ध तक्रारीचा पाऊस अधिष्ठात्यांना रोज उपस्थित राहण्याची सूचना; हसन मुश्रीफ 

   
सांगली, ता. ‘‘येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेले ५०० खाटांचे रुग्णालय, निवासी डॉक्टरांसाठी तीनमजली इमारत आणि अद्ययावत शवागारासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद केली जाईल,’’ अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना, ‘रोज दुपारी सांगली सिव्हिलमध्ये थांबा,’ अशी सूचनाही त्यांनी केली


आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सिव्हिल सर्जन  डॉ.विक्रमसिंह कदम,    अभिजित भोसले, रवींद्र खराडे, आशिष कोरी, मनोज भिसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, सुरेश दुधगावकर,सचिन आरवले, सातपूते यांनी ‘सिव्हिल’मधील अडचणींचा पाढा वाचला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘शासकीय रुग्णालयावर ताण आहे. मंजूर कामांसाठी तरतूद करून लवकर सुरू करू. स्थानिक प्रशासनाकडे औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. शंभर टक्के औषधांचा पुरवठा सुरू आहे. एकही चिठ्ठी बाहेर दिली जाणार नाही. सर्व तपासण्याही येथे केल्या जातील. 

‘सिव्हिल’च्या इमारतीचे तातडीने फायर ऑडिट करून घेतले जाईल.’’

आमदार सुधीर गाडगीळ यांनी, पुरेसे कर्मचारी नाहीत, सीटी स्कॅन यंत्रणा नाही, याकडे लक्ष वेधले. श्री. मुश्रीफ यांनी, ‘तातडीने इथली रिक्त पदे मंजूर केली जातील. वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी तातडीने भरले जातील. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील,’ अशी माहिती दिली. पृथ्वीराज पाटील यांनी, ‘महाविकास आघाडी काळात मंजूर कामांसाठी हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद केलीच पाहिजे,’ अशी भूमिका मांडली. ‘सीटी स्कॅन यंत्रणा मंजूर झाल्याचे दोन वर्षे ऐकतोय, कधी सुरू होणार,’ असा सवाल केला. त्यावर श्री. मुश्रीफ यांनी तातडीने मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले. रवींद्र खराडे यांनी इलेक्ट्रिकल ऑडिटचा मुद्दा मांडला.

अधिष्ठत्यांची कानउघाडणी

अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर सांगली रुग्णालयात येत नाहीत, हे ऐकताच मंत्री मुश्रीफ यांनी त्यांची कानउघाडणी केली. ‘तुम्ही सकाळी मिरजेत आणि दुपारी सांगलीत थांबा,’ अशा सूचना दिल्या. त्याकडे लक्ष ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. ‘डॉक्टरांचे वेळापत्रक जाहीर करा,’ असेही सांगितले. या बैठकीत पत्रकारांना मज्जाव केल्याबद्दलही मंत्र्यांनी  

मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी याबाबत श्री. मुश्रीफ यांना प्रश्‍न उपस्थित केला. त्या वेळी, ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांचे काम पहिले केले जाईल,’ असे सांगितल्याने हशा पिकला.

सांगलीवर कायमच अन्याय ः गाडगीळ

‘सिव्हिल’च्या यंत्रणेबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘कोणतीही सुविधा अथवा रुग्णालय मंजूर झाले, तर ते मिरजेला जाते. सांगलीवर कायमचा अन्याय केला जातो,’ अशी तक्रार केली. त्यावर, ‘पाचशे खाटांचे रुग्णालय सांगलीतच होईल,’ असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पृथ्वीराज पाटलांचा उपोषणाचा इशारा

काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, ‘येत्या हिवाळी अधिवेशनात सिव्हिलसाठी आर्थिक तरतूद करा, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसावे लागेल,’ असा इशारा दिला. श्री. मुश्रीफ यांनी त्याची गंभीर दखल घेतली. ‘पृथ्वीराज, तुमच्यावर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. आर्थिक तरतूद वेळेत केली जाईल,’ अशी ग्वाही दिली. रुग्णांना बाहेरून औषधे व विविध चाचण्या करायला सांगितले जात असल्याची तक्रार अभिजित भोसले, आशिष कोरी यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.