टक्के आरक्षणासाठी आता मुस्लिम समाज आक्रमक; पुकारला एल्गार!
मराठा आणि धनगर समाज आक्रमक झाला असतानाच आता मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. मुस्लिम समाज शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या मागणीसाठी जागरूक झाला आहे.
मुस्लिम जिमखाना येथे शनिवारी मुस्लिम हक्क परिषद झाली. या परिषदेला मुस्लिमांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुस्लिमांच्या आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी चार महिन्यांपासून राज्यभर बैठका घेऊन जागृती निर्माण केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेच, मात्र ओबीसीमधून न देता त्यांना स्वतंत्र मिळावे, अशी मागणी करतानाच मुस्लिम समाजाची स्थिती अत्यंत वाईट आहे.
शिक्षणात त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. सहा ते १४ वयोगटातील ७५ टक्के मुले शाळेच्या पहिल्या काही वर्षांतच शिक्षणापासून वंचित राहतात. केवळ दोन ते तीन टक्के मुले उच्च शिक्षण घेतात. दारिद्र्यरेषेखालीही मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे. सरकारी नोकऱ्या, तसेच खासगी नोकऱ्यांतही प्रमाण दोन ते अडीच टक्के आहे. मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण मिळावे, असा आग्रह मौलाना आझाद विचार मंचाने धरला आहे.
काय आहेत मागण्या?- केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करा.- पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी करा.- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या.- जिल्हानिहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी सरकारी वसतिगृहाची सोय करा.- मॉब लिंचिंग थांबवा. पीडितांना नुकसान भरपाई द्या.- राजकीय क्षेत्रात मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्या.- सर्व जाती-जमातींची जातनिहाय गणना करा.- राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी करा.- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झुंड हत्येविरोधी विशेष व शीघ्र कृती पथक प्रत्येक पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात स्थापन करावे.आमचा समाज अत्यंत गरीब आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण मिळाले पाहिजे.- खान अहमद अलीसर्व राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने मुस्लिम आरक्षणासाठी आग्रह धरीत आहेत. त्यांनी एका व्यासपीठावर येऊन मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी लढा द्यावा.- जमाल संजरआमच्या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. आमचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आम्हाला सरकारने शैक्षणिक मदत करावी. -शबाना खानमुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना पुरेसा निधी दिला जात नाही. त्या संस्था बंद पडू लागल्या आहेत. त्यांना पुरेसा निधी देऊन त्या संस्थांचे सक्षमीकरण करावे.- वकील खान
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.